Posts

Showing posts from October, 2018

🌹#कोणार्क(सुर्यमंदिर)🌹

# जगन्नाथ  पुरी पासून जवळच कोणार्क सुर्य मंदिर आहे...सूर्य जेव्हा पूर्वेकडून उगवतो...तेव्हा सूर्याचे पहिले किरण मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजातून आत येतात या मंदिरात कुठल्याही देवाची मूर्ती नाही...फक्त सूर्याचा रथ आहे ... त्याला 24 चाके व 7 घोडे आहेत.. चारही बाजूने सूर्याच्या वेगवेगळ्या प्रतिमा काळ्या दगडात आहेत... संपूर्ण मंदिर लाल दगडात बांधलेले आहे...कुठेही सिमेंट किंवा मातीचा वापर केलेला नाही...सगळीकडे इंटरलॉक पद्धतीने बांधकाम केलेले आहे...हे मंदिर बघून आपल्या तोंडातून आश्चर्यकारक उद्गार निघतात...एवढे हे मंदिर अप्रतिम आहे।  💐 💐 # हे  मंदिर बांधण्यासाठी 12 हजार मजूर 12 वर्षे काम करीत होते... रथाच्या चारही बाजूने जे रथचक्र बांधलेले आहेत त्यावर बारीक नक्षीकाम कोरलेले आहे...त्यावर आठ प्रहराचे आठ आऱ्या दाखवल्या आहेत...एक चाकाचे गणित करून किती वाजले हे सांगता येते...भारताची वेगवेगळी संस्कृती या रथावर कोरलेली आहे प्रवेश द्वारातच खाली मानव वरती हत्ती व त्यावर सिंह आशा मूर्ती दाखवल्या आहेत...मानवावर शक्ती व संपत्तीचा प्रभाव असतो असे दाखवले आहे...रथाच्या खालच्या बाजूला हत...