🌹Sharering is careing🌹
** # मैत्रिणींनो आज जवळ जवळ एक महिन्याने मी ही पोस्ट लिहीत आहे,तुमच्याशी कनेक्ट नव्हते पण मनाने तुमच्या सोबतच होते। 🥀 🥀 # माझ्या आजारपणाच्या निमित्ताने मला काही share करावेसे वाटले ,जेव्हा आपली एखादी परिचयाची व्यक्ती आजारी असते तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या प्रेमापोटी भेटायला जात असतो आणि त्या आजारी व्यक्तीला पण पडून पडून बोअर होते मानसिक बळाची आवश्यकता असते तर नक्की भेटायला जावे पण त्याचवेळी आपण काही पथ्ये पाळली तर त्या आजारी व्यक्तीला पण आनंद होतो आणि भेटणार्याला पण समाधान मिळते। 🌺 🌺 # जस ऑपरेशन झाल्या दिवशी कधीही भेटायला जाऊ नये भेटायला जाताना आधी फोन करून जाणे,सकाळी 9 किंवा 10 वाजता भेटायला न जाणे कारण घरात आजारी व्यक्ती जर स्त्री असेल तर घर सावरायला वेळ लागतो,कामवाली किंवा स्वयंपाक करणारी बाई याना घरातील माहिती नसते तर त्यांना सूचना द्याव्या लागतात,घर अस्ताव्यस्त असते तर ही वेळ टाळावी ,तसेच 12 ते 2 ही सर्वांची च जेवण्याची वेळ असते,पेशंटला गोळ्या घ्याव्या लागतात ,त्यासाठी वेळेवर जेवावे लागते,कुणी भेटायला आले तर उशीर होतो आणि सोडून जेवायला ओकवॉर्ड हो...