🌹#मार्लेश्वर🌹
# आम्ही 10 वर्षांपूर्वी आमच्या एक मैत्रिणीच्या ग्रुप बरोबर रत्नागिरी , गणपतीपुळे, पावस,मार्लेश्वर असे 5 दिवसासाठी गेलो ,रत्नागिरी येथे मुक्काम करून दररोज एक गावाला जाऊन रात्री परत हॉटेलवर येत असू,रत्नागिरी वरून एक दिवस पावस करून मार्लेश्वर येथे जायचे ठरले,सगळ्यांना विशेषतः मैत्रिणीला वाटले की मारलेश्वर हे डोंगरावर आहे तर तिथे लाईट असेल,म्हणून आम्ही अगोदर पावस केले,तिथे जरा जास्त वेळ गेला आणि तिथून निघायला 6 वाजले दिवस हिवाळ्याचे असल्याने दिवस लवकर मावळतो आणि अंधार पडला ,ड्राइवर ला रस्ता नीट न कळल्याने अजून थोडा जास्त वेळ लागला,रस्ता पण सगळा निर्मनुष्य होता,कोणाला रस्ता पण विचारायची सोय नाही ,आम्हाला वाटले रस्ता चुकलो,तेवढ्यात एक माणूस रस्त्यावर दिसला त्याला विचारले की मार्लेश्वर ला कोणता रस्ता जातो,तर तो म्हणाला "मी तेथील पुजारी आहे,मी तिकडेच चाललोय,मी दाखवतो रस्ता" ,तो आमच्या गाडीत बसला आणि आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोचलो,पण वरती चढून कस जाणार तिथे सगळा अंधार गुडूप होता,लाईटच नव्हते,मला वाटते बहुतेक अमावस्या जवळ होती म्हणून अंधार,आता कस करायचं, वरती कस जायच,पुजारी म्हण...