युरोप

सख्यानो आज आपला मनोगताचा दुसरा दिवस ,मी आज पासून माझ्या प्रवासाची कहाणी सुरू करते, मी 2004 आणि 2017 साली असे दोनवेळा युरोपला जाऊन आले,पहिल्यांदा गेले तेव्हा खूपच exited होते कारण प्रथमच विमानात बसणार होते,आणि परदेशाची ही पहिलीच वारी होती त्यामुळे सगळीकडे बघताना अगदी बारीक निरीक्षण असे,हे असे का ,ते तसे का,तेथील स्वच्छता,शिस्त,प्रामाणिकपणा,वक्तशीर पण याबद्दल खूप ऐकले होते .
लहानपणी जेव्हा इतिहासात ब्रिटिशांनी आपल्या देशावर शेकडो वर्षे राज्य केले,ते ब्रिटिश लोक कसे आहेत,काय त्यांच्या अंगी असे गुन आहेत की ते दुसऱ्या देशावर राज्य करू शकतात,असे बरेच प्रश्न होते . मी माझा भाचा लंडनला होता त्याच्याकडे आधी महिनाभर गेले,आणि मी आपली निरीक्षण करत राहायची आणि काही शंका असेल तर त्याला विचारायची
तो लगेच माझ्या शंकेचे निरसन करायचा ,परंतु दुसऱ्या वेळी गेले तेव्हा माझे बरेच देश बघून झाल्याने काही शंका नव्हत्या .
मी आता माझ्या 2017 वेळच्या युरोप टूर बद्दल लिहिणार आहे,तर सुरुवात करू लंडन पासून कारण ते आमचे पाहिले डेस्टिनेशन होते .आम्ही मँगो हॉलिडे तर्फे luftansa ऐअरवेज ने प्रथम मिलान मार्गे लंडन येथील हिथ्रो विमानतळावर उतरलो,मी दुसऱ्यांदा आल्याने मला काही नाही पण बाकीचे सोबतचे लोक पहिल्यांदाच आल्याने त्यांना खूप उत्सुकता होती,तरी पण पहिल्या दिवशी प्रवासाने थकल्यामुळे आम्ही आराम केला आणि दुसरे दिवशी निघालो लंडन सिटी टूर ला .
तर चला आता आपण लंडन शहरातून फेरफटका मारू,लंडन शहर हे थेम्स नदीच्या काठी वसलेले आहे ही नदि इतकी स्वच्छ आहे की यात पाणी फिल्टर करून टाकलंय की काय असे वाटते
प्रथम आम्ही लंडन ब्रिज (टॉवर ब्रिज ) ला गेलो ,हा
ब्रिज असा बांधला आहे की नदीतून एखादे मोठे जहाज जात असेल तर त्या ब्रिजचे दोन बाजू दोन्ही बाजूला उघडतात आणि तिथून जहाज गेले की परत ब्रिज जवळ येऊन जोडले जातात,की ब्रिज वाहतुकीला सज्ज होतो,त्यानंतर प्रसिद्ध असा pikadili सर्कस ,आणि traflgar square ही ठिकाणे बघितली,तिथे प्रसिद्ध आशा ब्रिटिश राजकीय नेत्यांच्या पुतळे आहेत,एक ठिकाणी गांधीजींचा पण पुतळा आहे,ब्रिटिश संसद वेस्ट मिनिस्टर abe ,प्रसिद्ध घड्याळ बिग बेन हे एका ब्रिटिश नेत्याच्या नावाने आहे,ते बघितले .टॉवर ऑफ लंडन येथे आपला कोहिनुर हिरा आहे पण तो तूर्तास कोणाला बघण्यास मिळत नाही .
बकिंगहॅम पॅलेस हे एक येथील प्रसिद्ध ठिकाण,ब्रिटिश राणीचा राजवाडा,अजूनही येथे ब्रिटिश घराण्यातील लोक राहतात,तिथे राजकीय नियम पाळले जातात,तेथील गार्ड बदलण्याचा एक मोठा सोहळा असतो,तो पाहण्यासाठी देशोदेशीचे लोक येऊन गर्दी करतात,त्यांचे गार्ड पारंपरिक वेशात घोड्यावर आणि काही पायदळ असे लेफ्ट राईट करत संपूर्ण राजवड्या भोवती फेरी मारतात,त्यांचा वेष म्हणजे डोक्यावर फरची काळी टोपी,लाल अंगरखा असा असतो,हा कार्यक्रम जवळ जवळ तासभर चालतो .एक अनोखा सोहळा बघितल्याचा आनंद मिळतो.
दुसरे आकर्षण म्हणजे लंडन आय,हे एक गोलाकार चक्र असते,त्याला थोड्या थोड्या अंतरावर मोठे मोठे काचेचे क्यूब्स असतात,एकेका क्यूब मध्ये 50 ते 60 लोक उभे राहू शकतात,या क्यूब्स हळू हळू वरती वरती जातात,तेव्हा संपूर्ण लंडन शहराचे विहंगम दृश्य दिसते,मध्यभागी थेम्स नदी आणि दोन्ही बाजूला प्रसिद्ध बिल्डिंग दिसतात,ही कॅब कधी वरती जाते याची आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही,सर्वात वरती आपली क्यूब जाते तेव्हा सगळ्यांच्या तोंडून आश्चर्य उद्गार बाहेर पडतात,आणि आपण हा विहंगम नजारा पाहण्यात दंगून जातो .
यानंतर येते मॅडम तुसाद वॅक्स म्युझियम जगातील। प्रसीद्ध व्यक्ती, खेळाडू, राजकारणी, कलाकार तसेच अंतराळ वीर असे वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचे वॅक्स चे पुतळे हुबेहूब तयार केलेले आहेत ,त्यात आपल्या देशातील सचिन तेंडुलकर ,इंदिरा गांधी ,अमिताभ बच्चन,कतरीना , सलमान ,माधुरी ,शाहरुख ,तसेच आपले आत्ताचे मशाहूर पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचे सुंदर पुतळे बनवले आहेत .डायना ,बाराक ओबामा , हेडन, ट्रम्प,बेनझीर भुट्टो,राणी एलिझाबेथ , अस्ट्रोनाट ,आशा महान व्यक्तींचे पुतळे बघून आपण अचंबित होतो आणि एक वेगळ्याच दुनियेत गेल्याचे समाधान मिळते .
ही झाली आपली लंडन ची सफर यानंतर आपण स्टेना लाईन या सात मजली क्रुजने amstardam या शहरात पोचणार आहोत पण पुढील आठवड्यात ,तोपर्यंत बाय bay
31/3/18
🌸#सरोजच्या#लेखणीतून🌸

Comments

Popular posts from this blog

#मानव निर्मित स्वप्न नगरी #दुबई 💐💐

🌹#पुष्कर,#चितोडगड🌹

🌹#माझा कॅन्सरशी लढा 🌹