मनोगत
सख्यानो आज आपला मनोगताचा दिवस,मी माझे मनोगत प्रवास वर्णना द्वारे व्यक्त करणार आहे .☺️☺️
फार पाल्हाळ लावून बोअर करणार नाही,पण तुम्हाला उत्सुकता वाटेल आशा प्रकारे मी तुम्हाला वेगवेगळ्या देशात आणि परदेशात फेरफटका मारून आणीन,आणि त्याद्वारे तुम्हाला परदेश प्रवासाचा अनुभव मिळेल याची खात्री बाळगा . 💐💐
मला प्रवासाची फार आवड,ही आवड मला माझ्या वडिलांकडून वारसा हक्काने आली आहे ,त्यांनी मलाच काय सर्व कुटुंबाला आजी साहित 50 वर्षा पूर्वी जवळ जवळ पूर्ण भारत देश फिरवून आणलाय, त्याकाळी आजच्या सारखी प्रवासाची साधने ,तसेच हॉटेल्स आणि पर्यटन कंपन्या कशाचीही सोय नव्हती किंवा 4-4 महिने आधी रिझरवेशन ची पण सोय नव्हती .
आमच्या सोबत आम्ही स्वयंपाकाचे साहित्य डाळ,तांदूळ,चहा,साखर,भांडी आणि स्टोव्ह असे सगळे साहित्य एका पत्र्याच्या पेटीत घ्यायचो, जिथे जाईल तिथे रॉकेल,भाजी आणि थोडेसे गोडेतेल घ्यायचो असे विंचवाचे बिऱ्हाड आमच्या पाठीवर असायचे ,सोबत एक नोकर असायचा तो भांडी घासणे,भाजी आणणे,निवडून देणे ,ओझी उचलणे ही कामे करायचा ,त्या बदल्यात आणि त्याला फ्री न्यायचो ,त्यालाही आमच्या बरोबर चार धाम आणि सगळे बघायला मिळाले .त्यावेळी आताच्या सारखे हॉटेलचे प्रस्थ नव्हते,जागोजागी बिर्ला किंवा इतर आशा धर्मशाळा असायच्या,त्या पण सुस्थितीत आणि स्वच्छ,आणि भाडे म्हणाल तर 5 आणि 10 रुपये किंवा काही ठिकाणी ऐच्छिक असायचे .☺️☺️
मी त्यावेळो 10/11 वर्षाची असल्याने मला पुसट पुसट आठवते आशा परिस्थितीत आम्ही बद्रीनाथ ते कन्याकुमारी आणि द्वारका ते गंगासागर असे फिरायचो ,ही सर्व ठिकाणे माझी नंतर 2/2 वेळा किंवा काही तर चार वेळा फिरून झाली कन्याकुमारी ला माझे चार वेळा जाणे झाले असो.
मला माझ्या वडिलांकडून मिळालेला वारसा किंवा आवड मी पुढेही तशीच जपली आणि मी माझ्या परीने ती पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे,मी इतकी प्रवास वेडी आहे की,मला एक वेळ साड्या,दागिने नसले तरी चालतील पण प्रवास पाहिजे, वर्षातून एकदा डोमेस्टिक आणि एक इंटरनॅशनल अशी ट्रिप करायचीच असा मी गेल्या 12 -13 वर्षांपासून संकल्प केला आहे म्हणूनच मी आत्ता पर्यंत 21 देश आणि 80% भारत बघू शकले,यापुढेही मला परमेश्वराने साथ दिली,निरोगी आयुष्य दिले तर मी संपूर्ण जग बघण्याचा माझा मानस आहे,बघू या कितपत माझे स्वप्न देव खरे करतो ,तूर्तास एव्हढी प्रस्तावना पुरे .💐💐
प्रवास वर्णन पुढील आठवड्यापासून सुरू आणि सुरुवात मस्त प्रभू श्रीरामाच्या दर्शनाने करू.

Comments
Post a Comment