**#ट्युलिप #गार्डन **(स्वर्गीय अनुभव )


💐💐 सख्यानो आजचा आपला मनोगताचा दिवस,आपण आज जाणार आहोत ट्युलिप गार्डन,amstardan इथे 💐💐
आम्ही लंडन वरून स्टेना लाईन या सात मजली क्रुजने नेदरलँड या देशाकडे निघालो,क्रुज खूप मोठं होत,तळमजल्यावर मोठं मोठ्या गाड्या
साठी भव्य पार्किंग होत ,आम्ही लिफ्टच्या पाचव्या मजल्यावर गेलो तिथे भव्य असा डान्स फ्लोअर होता ,सहाव्या मजल्यावर आमच्या रूम्स होत्या हॉटेल सारख्याच प्रत्येक रुम मध्ये बंक बेड दोघांसाठी,बाथरूम चकचकीत आणि सर्वात
वरच्या मजल्यावर restarant होते ,आम्ही रात्री
तेथे डान्सची मजा घेतली आणि सकाळी जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा मात्र अप्रतिम दृश्य पाहायला
मिळाले,सूर्य हळूहळू पाण्यातून वर येत होता आकाश आणि पाणी सगळे केशरी लाल रंगाचे झाले होते ,अहाहा काय दृश्य होते ----
** त्यातच डॉल्फिन जोरजोरात उसळ्या मारुन वर येत होते रात्रभर प्रवास करून आंम्ही सकाळी 9 वाजता इच्छित स्थळी पोचलो तिथून 1 तासाच्या प्रवास करून कोकेनहाफ या जग प्रसिद्ध
ट्युलिप गार्डनला पोचलो,इथे जग भरातून पर्यटक हे गार्डन बघण्यासाठी येतात ,मी सुद्धा याच गार्डन साठी दुसऱ्यांदा युरोपला आले होते ****
💐💐 आम्ही जेव्हा गार्डन च्या आत पोचलो तेव्हा अक्षरशः तेथील दृश्य बघून वेडेच झालो ,
काय बघू नि काय नाही असे झाले होते जिकडे
पाहावे तिकडे वेगवेगळ्या रंगाची आणि आकर्षक
पद्धतीने लावलेली ट्युलिप ची फुले फुललेली
होती ,लाल,पिवळा,गुलाबी,जांभळा,निळा,केशरी
कला,हिरवा ,पांढरा असे कितीतरी आकर्षक
रंगाची फुले फुलली होती ,गार्डन च्या मध्यभागी
आकर्षण तळे आणि त्यात कारंजे थुईथुई नाचत
होते आणि पांढरे शुभ्र बगळे मुक्तपणे विहार करत
होते ,आम्ही तर अक्षरशः स्वर्गात असल्याचा भास
होत होता .💐💐💐💐
*** फोटो तर किती काढू नि काय काढू कळतच
नव्हते अरे आता इथे काढला नंतर पुन्हा काढू
असे म्हणले की पुढे अजूनच सुंदर फुलांची रचना
दिसायची की,परत फोटो काढा,आम्ही तिघी
मैत्रिणी एकाच रूममध्ये होतो ,आम्ही तिघीनी
तर खूप धमाल केली ,हे गार्डन पाहण्यासाठी
दिवसभराचा वेळ दिला तरी कमीच पडेल एव्हढे
मोठे हे गार्डन आहे ,आपल्या इथे श्रीनगर इथे असे
गार्डन केले आहे पण ते एव्हढे मोठे नाही किंवा
रचना आकर्षक नाही ,असो. 💐💐
Amstardam हे शहर कालव्याचे शहर
असून छोटे मोठे असंख्य कालवे असून त्यातूनच
इलेक्ट्रिक बोटीतून वाहतुक सुरू असते,आपल्याला
पण या बोटीतून एक तासाची राईड करून मस्त
अनुभव घेता येतो इथे पर्यावरण बद्दल खूपच
जागरूकता दिसली,प्रदूषण होऊ नये म्हणू येथील लोक जास्तीत जास्त सायकलीचा वापर करतात
तसेच रस्त्यावर देखील कार्स दिसत नाहीत तर
ट्राम्स ने प्रवास करतात ,जागोजागी सायकलचे
पार्किंग असते ,तेथून सायकल भाड्याने घ्यायची मशीन मध्ये कार्ड स्वाईप करायचे त्यावर वेळ टाकायची आणि आपली वेळ संपली की ,
काम झाले की,परत तिथे सायकल नेऊन लावायची
किती प्रामाणिक आणि किती पर्यावरण प्रेमी
आहेत ते लोक ,आपल्या देशाबद्दल किती जागरूक
आणि देशाचे नुकसान होवू नये अशी काळजी
घेतात ते लोक ****
💐💐 ट्राम्स सुद्धा आकर्षक पद्धतीने वरती
डिझाइन्स काढलेले आणि स्वच्छ असतात ,जेव्हा
ट्रॅकवर ट्राम्स नसतात तेव्हा त्याच ट्रॅक्स वरून इतर
वाहने पण जाऊ शकतात, कालव्यातून जेव्हा बोट राईड घेतो तेव्हा कालव्याच्या दोन्ही बाजूने
सुंदर सुंदर आणि आकर्षक आणि वेगळ्या पद्धतीने बांधलेल्या आशा बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात ,ही राईड खूप छान आहे एक तास कसा गेला कळत नाही ***
💐💐 अजून इथे उडन शूज फेक्ट्री आणि चीज कसे तयार करतात याचा डेमो बघायला मिळतो . एकूण काय नेदरलँड या देशातील आपला वेळ कसा गेला हे कळत नाही आणि आपण एखाद्या स्वप्नातून बाहेर पडलो की काय असा भास होतो ,आपले हे स्वप्न कधीच संपू नये असे वाटते.💐 💐💐
🌸#सरोजच्या #लेखणीतून 🌸

Comments

Popular posts from this blog

#मानव निर्मित स्वप्न नगरी #दुबई 💐💐

🌹#पुष्कर,#चितोडगड🌹

🌹#माझा कॅन्सरशी लढा 🌹