💐जुळले ऋणानुबंध 💐
*** # आम्ही 2016 साली मोठ्या मुलीसोबत आडीरोंडक पार्क येथे कॅम्पिंग साठी गेलो...तिचे सासू सासरे,दिर,जाऊ,दोन मुलं आणि आम्ही दोघे असे 10 जण होतो ..एक फोल्डिंगचा तंबू आणि खाण्या पिण्याचे सर्व सामान...दूध,शेगडी सर्व सोबत घेऊन गेलो,उंच उंच झाडे असलेल्या एक गोलाकार जागेत लाकडी टेबल..एक लाईट कनेक्शन,एक शेगडी वजा भट्टी आणि एक नळाचे कनेक्शन दिलेले होते ... पण भोवती घनदाट जंगल होते ...तिथून जवळच कॉमन टॉयलेट आणि बाथरूम ..पण तिकडे रात्रीचे एकट जायला भीती वाटायची...त्यातच एक रकून नावाचा कोल्ह्या सारखा प्राणी सारखा आमच्या टेबलाजवळ यायचा ..कारण त्याला पदार्थाचा वास यायचा त्यामुळे आम्हाला रात्रभर थोडी भीती वाटत होती पण आम्ही 10 लोक असल्याने बार्बेक्यू केले,पास्ता करून खाल्ला,पत्ते खेळले आणि खूप एन्जॉय केले...दुसरे दिवशी फिरायला गेलो...फिरत फिरत जिथे सर्व कारव्हॅन लावलेल्या होत्या तिथे गेलो ...बाकीचे लोक इकडे तिकडे फिरत असताना माझे लक्ष एका कार व्हॅन कडे गेले ...मला ती आतून बघ न्याची खूप इच्छा होती..पण कशी बघणार...मी तिकडे गेले ..व्हॅनच्या बाहेर एक अमेरिकन स्त्री खुर्चीवर पुस्तक वाचत बसलेली होत...