Posts

Showing posts from June, 2019

🌹#योग आणि प्राणायाम 🌹

# Sharing  is caring # परवा  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मी एक पोस्ट केली होती, तेव्हा मॅडम नि सांगितले काही माहिती सांगता आली तर सांगा आणि काही मैत्रिणी पण म्हणाल्या म्हणून मी या निमित्ताने काही सांगण्याचा प्रयत्न करते,मला तो कितपत जमेल माहीत नाही।  🌸 🌸 # प्रथम  आपल्या मनाचा निर्धार हवा की मी दररोज नियमित योगा करीन आज केला ,उद्या नाही अस होता कामा नये,नाहीतर आपण जे करतो त्याचे परिणाम आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणतो मला काही उपयोग नाही झाला ... प्रथम आपण योग आणि प्राणायाम करण्यासाठी जी वेळ निवडतो ती योग्य हवी... एकतर सकाळी अनशापोटी योग करा किंवा संध्याकाळी पण उपाशी पोटी,शक्यतो मोकळ्या हवेत जसे बागेत किंवा मग जमत नसल्यास घरातच...फरशीवर न बसता खाली आसन घ्यावे...कमीतकमी 5 प्राणायम आणि 15 मिनिटे तरी योग करावा  🌷 🌷 # त्याआधी  काही नियम पाळावे # आसन **वेळ,स्थान,वेशभूषा, आसन आणि मात्रा योग्य असावे प्राणायाम करताना वज्रासन किंवा पद्मासन मध्ये बसावे आणि ध्यान मुद्रा करावी म्हणजे त्याचा फायदा होतो ** # व्यायाम **आसन आणि प्राणायाम मुळे शर...

🌹#पावसाची #आठवण🌹

# माझं  लग्न 1975 साली झालं म्हणजे लग्नाला 44 वर्षे झाली...लग्नानंतरची नाही पण लग्नातली पावसाची आठवण झाली ...लग्न 31 मे म्हणजे उन्हाळ्यात होत...पण त्याआधी लग्नघरी काही देव देवाची कार्ये असतात...त्यात पहिल्या दिवशी बालाजी किंवा कुलदैवताच पारण मग दुसरे दिवशी मांडव आंबील म्हणजे मांडव घालणे...त्या दिवशी सकाळी उठून घरातील सर्व स्त्रिया तेल लावून डोक्यावरुन नाहतात .. तसेच गावातील नातेवाईक बायकांना पण नहायला बोलावतात त्यादिवशी सगळा सवाष्णीचा मान असतो...नहाणी झाल्यावर वाजत गाजत कुंभाराकडे जाऊन शुभ असणारी मातीची सुगडी घरी घेऊन यायची...त्याला अक्षता आणि हळद लावून ती सुगडी शोभिवंत करायची ती सकाळी तयार केलेल्या मांडवात ठेवून त्याची पूजा करायची..मांडवा च्या चारही खांबाला बांधून त्यावर दिवे ठेवायचे आणि मुंजनदोरा बांधायचा*** # त्यानंतर  घरी कासार बोलावून सगळ्या सवाष्णीना हिरव्या किंवा तत्सम बांगड्या भरायच्या ,नवरी आणि वरमाय हातात हिरवा चुडा घालतात...त्यानंतर नवरी किंवा नवरदेव नवीन कपडे घालून डोक्याला मुंडावळ्या बांधून पोचम्मा देवीला वाजत गाजत पाया पडायला जातात ...तिथे नैवेद्य आणि आहेर ...