🌹#भातुकली 🌹
# जयश्री पोळचा लेख वाचून मलाही माझं बालपण आठवलं ... तेव्हा आम्ही असू 5वी किंवा 6 वी मध्ये...गल्लीतल्या आम्ही सर्व मैत्रिणी मिळून पितळेची आणि प्लॅस्टिकची भांडीकुंडी घेऊन भातुकली खेळत असू...त्याच दरम्यान माझ्या भावाचे आणि बहिणीचे लग्न झाले आणि आमच्या डोक्यात खरीखुरी भातुकली खेळायचे खूळ भरले ... मग नवरी कोणाची आणि नवरदेव कोणाचा याची चर्चा झाली...मी बाकीच्या पेक्षा जरा सधन होते म्हणून मग मी नवरी घेतली कारण त्यावेळच्या प्रथेप्रमाणे मी हुंडा देऊ शकत होते...मग ठरलं !माझी नवरी आणि मैत्रीण उषा मामडे हिचा नवरा...माझी एक मैत्रीण शुभदा जोशी हिचे वडील पौरोहित्य करायचे म्हणून तिला आम्ही भटजी बनवले 💃 💃 # एक छानसा मुहूर्त बघून दिवस ठरवला...त्याआधी मी माझ्या आईकडून खरोखरीच्या चकल्या लाडू ,चिवडा आणि करंज्या करवून घेतल्या आम्ही साधारण मित्र मैत्रिणी मिळून 15/20जण होतो...मी माझ्या वडिलांनी शेंडेफळ म्हणून खूप लाडकी होते मी कुठली मागणी केली आणि त्यांनी ती पूर्ण केली नाही असे कधी होतच नसे...त्यामुळे मी त्यांना सांगितले की,"मला 100/200 रुपये खर्च येणार आहे ते त्यांनी मान्य केले...कारण...