🌹 #माझी कविता 🌹
# आज काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलाय,कितपत जमलाय माहीत नाही आता मला जगायचंय ! सारं जग फिरायचय। !! प्राग, व्हिएन्ना,बुडापेस्ट ! माझी वेगळीच आहे टेस्ट। !! यावर्षीचा टार्गेट होत नॉर्वे ! स्वप्न होतील का माझी पूर्ण सर्वे। !! हसणं, खेळणं,कुदळण आणि वेड्या सारखं भटकणं हा तर माझा छंद ! निसर्गात रमून भरभरून घ्यावा आनंद। !! आतापर्यंत भारत फीरून झालाय सर्व आणि फक्त झालेत 22 देश! पण आवडतो मला देश तसा वेश !! जेव्हा माणसांवर संकट येतं तेव्हा आठवतो देव ! माझी एव्हढीच एक ईच्छा देवा सुखरूप मला ठेव !! सुखरूप मला ठेव !! # सरोजच्या लेखणीतून 27/9/19