🌹#पुष्कर,#चितोडगड🌹
# अजमेर येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिस्तीचा दर्गा भारतात प्रसिद्ध आहे,तिथे गेलो पण मशिदीमध्ये खूप चेंगर चेंगरी होतें, कारण मोठं मोठी फुलांची ताटे घेऊन लोक मशिदीमध्ये दर्शनाला येतात *** # संपूर्ण भारतामध्ये ब्रम्हदेवाचे मंदिर एकच आहे आणि ते पुष्कर येथे आहे...मंदिर खूप पुरातन आणि सुंदर आहे...हे काशी क्षेत्रा इतकेच पवित्र मानतात ,इथे गायत्री ची जन्मभूमी आणि पवित्र तलाव आहे...गावात अनेक देवळे तसेच मठ आहेत...इथे खूप फॉरेनर्स येत असल्याने बाजापेठेतही तशाच वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत 🏵️ 🏵️ #पुष्कर ते चितोडगड अंतर 250 किमी असल्याने आम्ही सकाळीच निघालो...चितोडगड हा आशिया तील सर्वात मोठा आणि भारतातील सर्वात महत्वाचा किल्ला आहे, कारण इथूनच पुढे भारताचा महत्वाचा इतिहास घडला,हा किल्ला म्हणजे भक्ती-मीराबाई शक्ती -राणा प्रताप आणि बलिदान - पन्नदाई या गोष्टीने पावन झालेला आहे... या किल्ल्याच्या सीमा माशाच्या आकाराच्या आहेत,एकाच डोंगरावर असून 200 मीटर उंचीवर आहे... इथे पूर्वी 70 हजार लोक राहत होते...या किल्ल्याला 7 दरवाजे आहेत,इथे राहणारे सर्व राजे शूरवीर आणि सूर्यवंशी होते, सूर्याच्य...