#मानव निर्मित स्वप्न नगरी #दुबई 💐💐


**** सख्यानो ...आपण गेले 11 आठवडे युरोप फिरून आलो आता मी .....तुम्हाला स्वप्न नगरी दुबईला फिरवून आणणार ...आहे ,चला तर तयार व्हा ,आहात ना 💐💐
*** Air Arabia च्या प्लेन ✈️....ने आम्ही प्रथम
UAE या देशातील शारजा ....या राज्यात प्रवेश केला ,मुंबई ते शारजा आम्हाला ...अडीच तास लागले। शारजा हे शहर.... तलावा काठी असून
सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते ...येथे gold souq square ,मस्जिद 🕌.....आणि शारजा लेक ,डेट्सची 🏝️झाडे हे प्रसिद्ध आहेत
** #नाईट लाईफ,डान्स बार वैगेरे इथे ....काहीही
नाही ,इथे संपूर्ण दारू बंदी ...आहे ,प्युअर सांस्कृतिक नगरी म्हणून ....ओळखली जाते ,हे पूर्ण
बिझनेस सिटी आहे,लोक इथे राहून... दुबईला
नोकरीसाठी जाणे ...येणे करतात कारण फक्त एक
तासाच्या अंतरावर दुबई आहे ... प्रत्येकाचे खाजगी
पण इथे जपले जाते ... इथे पेट्रोल स्वस्त आणि पाणी महाग आहे ,कारण सगळा समुद्रच ...आहे
गोड पाण्याच्या नद्यांच ....नाहीत खारे हवामान आणि जमिनीमुळे येथे खजूर ....खूप प्रमाणात पिकतो ,इथून संपूर्ण ....जगात तो निर्यात केला जातो 🕋 किंग फैजल मस्जिद येथेच आहे 💐💐
#संपूर्ण पब्लिक एरियामध्ये CCTV बसवलेले ..
आहेत त्यामुळे सहसा .....गुन्हे घडत नाहीत येथील
पुरुष घोळदार झगा घालतात ...त्याला कंदुरा
म्हणतात आणि ...डोक्याला विशिष्ट पद्धतीने पांढरा
रुमाल बांधलेला असतो ...त्यांच्या रुपयांवर अरेबिक भाषेत मजकूर लिहिलेला ...असतो पूर्वी
इथे इंडियन करन्सी वापरत असत पण आता ....
अरेबिक करन्सी ....वापरतात त्याला dirham असे
म्हणतात **
#येथे सात आयलंड ....आहेत ,त्याची सात
राज्ये आहेत ,सर्वांचा मिळून एक देश.... आहे
त्याला UNITED ARAB AMIRATES असे ... म्हणजे UAE असे म्हणतात ...प्रत्येक राज्याचे कायदे वेगवेगळे आहेत ...अबुधाबी ही देशाची
राजधानी आहे , फुजियरा ,अबुधाबी....दुबई
शारजा ,अजमान, Ras Al khaimah ,umm
Al quwain , अशी सात राज्य ...आहेत सर्वाना मिळून Uae असे म्हणतात 🍁🍁
#इथे हॉटेलचे चेक ....इन दुपारी 2 वाजता
असते त्यामुळे आम्ही शारजा इथेच इंडियन ...
हॉटेल मध्ये नास्ता ,,🥘🥘घेऊन दुपारी दुबईला गेलो ,रात्रभर जागरण झाल्याने ....दुपारी विश्रांती
घेऊन संध्याकाळी डाऊ या क्रुजवर ....डीनरसाठी
गेलो ,हे क्रुज 🛳️🛳️संपूर्ण लाईटने सजवलेले
असते आणि प्रत्येक क्रुजवर ....अनेक देशातील
पर्यटक एन्जॉय करत असतात ... कृजवर अरेबिक
पध्दतीचा डान्स ...असतो ,तसेच त्यानंतर हिंदी ...
गाणी लावून ....भारतीय पर्यटक डान्सचा मजा
घेत असतात,आम्ही पण डान्स 💃💃करून
खूप धमाल केली ...जसजशी हिंदी फेमस गाणी
लागायला लागली तसतसा ...सगळ्यांना चेव यायला लागला ...आणि सर्वजण बेभान होऊन नाचले शेवटी सगळे दमल्या नंतर ... आपोआपच
डीनरकडे वळले आणि ...चुपचाप हात तोंडाची
गाठ पडली ,शेवटी सगळे दमून.... हॉटेल वर
परत गेले आणि चुपचाप झोपून गेले 🌺🌺

Comments

Popular posts from this blog

🌹#पुष्कर,#चितोडगड🌹

🌹#माझा कॅन्सरशी लढा 🌹