Posts

💐💐निसर्गरम्य ऑस्ट्रिया💐💐

** लिचेस्टाईन (ऑस्ट्रिया )या.... देशातील वडूज या सिटी मध्ये आम्ही..... गेलो,लिचेस्टाईन हा देश खूप छोटा असून निसर्ग सौंदर्याचं दान .....ईश्वराने या देशाला भर ......भरून दिल आहे ,या देशाची लोकसंख्या फक्त 30 ते 35 हजार .....आहे , या ....देशाच्या संसदेत .....फक्त 25 सभासद आहेत . *** थोड्या थोड्या अंतराने बर्फाच्छादित  🏔️ डोंगर,त्यावर धरतीला ....कवेत घेण्यासाठी खाली उतरणारे ढग,....मध्येच एखादा सुंदर लेक अहाहा आपण गर्भगळीत .....होऊन जातो हे निसर्ग सौंदर्य बघून....त्यातच आम्ही टॉय ट्रेन ने संपूर्ण गावात फेर फटका मारला....एव्हढेसे ते गाव आणि एकदम सुबक आणि आकर्षक ....म्हटल्यावर आम्ही वेडे नाही झालो तरच आश्चर्य .... सगळीकडे पसरलेली हिरवाई .... माणूस निसर्ग  🏞️  सौंदर्य बघून मोहित होणारच होणार  💐 💐 *** एव्हढ्या छोट्या गावात ....देखील इंडियन रेस्टॉरंट होते आणि ... जेवण सुद्धा एकदम , 😋 😋 Yummmy मग काय सगळ्यांनी ....मस्त ताव मारला जेवणावर आणि तृप्त मनाने  😎 😎 बाहेर आलो ....छोटेसे गाव पण एकदम आकर्षक,ठेंगणे , ठुस्के असे, टॉय ट्रेन मधून गावात ....फेरफटका मारताना ...

#मानव निर्मित स्वप्न नगरी #दुबई 💐💐

**** सख्यानो ...आपण गेले 11 आठवडे युरोप फिरून आलो आता मी .....तुम्हाला स्वप्न नगरी दुबईला फिरवून आणणार ...आहे ,चला तर तयार व्हा ,आहात ना  💐 💐 *** Air Arabia च्या प्लेन  ✈️ ....ने आम्ही प्रथम UAE या देशातील शारजा ....या राज्यात प्रवेश केला ,मुंबई ते शारजा आम्हाला ...अडीच तास लागले। शारजा हे शहर.... तलावा काठी असून सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते ...येथे gold souq square ,मस्जिद  🕌 .....आणि शारजा लेक ,डेट्सची  🏝️ झाडे हे प्रसिद्ध आहेत **  # नाईट  लाईफ,डान्स बार वैगेरे इथे ....काहीही नाही ,इथे संपूर्ण दारू बंदी ...आहे ,प्युअर सांस्कृतिक नगरी म्हणून ....ओळखली जाते ,हे पूर्ण बिझनेस सिटी आहे,लोक इथे राहून... दुबईला नोकरीसाठी जाणे ...येणे करतात कारण फक्त एक तासाच्या अंतरावर दुबई आहे ... प्रत्येकाचे खाजगी पण इथे जपले जाते ... इथे पेट्रोल स्वस्त आणि पाणी महाग आहे ,कारण सगळा समुद्रच ...आहे गोड पाण्याच्या नद्यांच ....नाहीत खारे हवामान आणि जमिनीमुळे येथे खजूर ....खूप प्रमाणात पिकतो ,इथून संपूर्ण ....जगात तो निर्यात केला जातो  🕋  किंग फैजल मस्जिद...

🌹#उदयपूर🌹

# प्रथम  सर्व मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...आज आपण लेक सिटी किंवा व्हाईट सिटी उदयपूर ला जाणार आहोत... इथे 5 लेक आहेत म्हणून या सिटी ला लेक सिटी म्हणतात...चारही बाजुनी अरवली पर्वत रांगा आणि मध्यभागी शहर वसलेले आहे,ते खूप सुंदर दिसते...455 वर्षापूर्वी महाराजा उदयसिंगने शहर वसविले त्याचे 24 वंशज सध्या सिटी पॅलेस मध्ये राहतात  🌼 🌼 # मोती  नगरी/प्रताप स्मारक हे इथे प्रसिद्ध असून बाप्पा रावल याने मेवाड वसविले,एकलिंगजी ही पहिली राजधानी व त्यानंतर उदयपूर ही राजधानी आहे...राणा प्रताप 36 वर्षे मोगलांशी लढला ती लढाई हल्दीघाटी येथे झाली, हल्दीघाटी म्हणजे पिवळी माती, म्हणून हलदी घाटी म्हणतात,इथे मोगलांशी लढताना चेतक घोड्याने घायाळ असून देखील राजाला वाचविले व स्वतः प्राण सोडले, त्यामुळे तो अमर झाला,त्याचे स्मारक म्हणजे मोतिमगरी हे आहे हा पुतळा सांगली,महाराष्ट्र येथील कलाकार शामसुंदर म्हात्रे याने तयार केला आहे  🌸 🌸 # एक  साधूने सांगितले की मी जिथे बसलो आहे तिथेच तू राजवाडा बांधलास तर मेवाडचा उदो उदो होईल म्हणून राजाने तिथेच पॅलेस बांधला तोच सिटी पॅ...

🌹#पुष्कर,#चितोडगड🌹

# अजमेर  येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिस्तीचा दर्गा भारतात प्रसिद्ध आहे,तिथे गेलो पण मशिदीमध्ये खूप चेंगर चेंगरी होतें, कारण मोठं मोठी फुलांची ताटे घेऊन लोक मशिदीमध्ये दर्शनाला येतात *** # संपूर्ण  भारतामध्ये ब्रम्हदेवाचे मंदिर एकच आहे आणि ते पुष्कर येथे आहे...मंदिर खूप पुरातन आणि सुंदर आहे...हे काशी क्षेत्रा इतकेच पवित्र मानतात ,इथे गायत्री ची जन्मभूमी आणि पवित्र तलाव आहे...गावात अनेक देवळे तसेच मठ आहेत...इथे खूप फॉरेनर्स येत असल्याने बाजापेठेतही तशाच वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत 🏵️ 🏵️ #पुष्कर ते चितोडगड अंतर 250 किमी असल्याने आम्ही सकाळीच निघालो...चितोडगड हा आशिया तील सर्वात मोठा आणि भारतातील सर्वात महत्वाचा किल्ला आहे, कारण इथूनच पुढे भारताचा महत्वाचा इतिहास घडला,हा किल्ला म्हणजे भक्ती-मीराबाई शक्ती -राणा प्रताप आणि बलिदान - पन्नदाई या गोष्टीने पावन झालेला आहे... या किल्ल्याच्या सीमा माशाच्या आकाराच्या आहेत,एकाच डोंगरावर असून 200 मीटर उंचीवर आहे... इथे पूर्वी 70 हजार लोक राहत होते...या किल्ल्याला 7 दरवाजे आहेत,इथे राहणारे सर्व राजे शूरवीर आणि सूर्यवंशी होते, सूर्याच्य...

🌹#माझा कॅन्सरशी लढा 🌹

# मैत्रिणींनो हे शीर्षक वाचून हबकलात ना , खरंच मी गेले 6 महिने लढाच देत आहे ... नाही नाही म्हणता हा पाहूणा आला की , माझ्या घरी एक दिवस , तरी मी त्याला जवळ जवळ 6/7 महिने हुलकावण्या देत होते , तो त्याची चाहूल दाखवत होता , कधी पोट दुखून तर कधी चक्कर येऊन , पण मीच त्याची दखल घेत नव्हते , मग मात्र त्याने एकदम झटकाच दिला अचानक , डॉक्टरने सोनिग्राफी करायला सांगितली आणि त्यात कळून आले की हा पाहून माझ्या घरात येऊन पोचलाय आणि हळूहळू हातपाय पसरायला सुरुवात केलीय ... मग मात्र माझ्या पाया खालची जमीनच सरकली ... डोळ्यापुढे अंधारी आली आणि चक्कर येऊन पडायची बाकी राहिले ... मनात आलं देवा का याला माझ्याच घरी यावस वाटलं , माझी काय चुकी झाली , खूप नैराश्य आलं , आता आपलं जीवन सम्पल अस वाटलं .... काय करू काय नको , पण त्याचवेळी माझे पती , दोन जावई आणि दोन्ही मुली यांनी मला खूप भावनिक आधार दिला आणि मला खंबीर बनवलं ... आणि आल्या परिस्थितीला तोंड कस द्यायचं हे शिकवल...

🌹#जयपूर🌹

#जयपूर या शहरात सगळी घरे पिंक किंवा गुलाबी आहेत,म्हणून या शहराला पिंक सिटी म्हणतात त्यामुळे हे शहर बघण्याची खूप इच्छा होती *** #जयपूर इथे भारतामध्ये एकमेव सुंदर असे सिनेमा थिएटर आहे त्याचे नाव राजमंदिर असून ते खूप पाहण्यासारखे आहे ,त्याचे इंटेरियर अप्रतिम आहे...जयपूर मध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती हे थिएटर पहाटेच पाहते ** #जयपूर सिटी ही राजा जयसिंग याने 1827 साली वसविली,इथले पदार्थ म्हणजे दालबाटी, चुरमा आणि घेवर हे प्रसिद्ध आहे तसेच गनगौरी,तिज हे महत्वाचे सण आहेत,लहेनगा, चुंनी,बांधणी प्रिंट, रजई,कुंदनवर्क,या येथील प्रसिद्ध कला आहेत...दिल्ली सारखाच इथेही जनपथ आहे,दोन्ही बाजूस शासकीय इमारती आहेत...प्रिन्स अलबर्ट जेव्हा जयपूर इथे आला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी राजाने सर्वाना गुलाब आणण्यास सांगितले एव्हढं गुलाब आणणे शक्य नव्हते म्हणून,सर्व घरांना पिंक/गुलाबी रंग देण्यास सांगितले आणि अजूनही तो नियम सगळे पाळतात...बाजार पेठेतील सर्व दुकाने /घरे गुलाबीच आहेत,दुकानाची नावे काळ्यावर पांढरी लिहिलेली आहेत...कोणी नवीन घर बांधले आणि गुलाबी रंग दिला नाहीतर 5000रु दंड आहे 🌼 🌼 # याच  भागात...