Posts

Showing posts from March, 2018

युरोप

सख्यानो आज आपला मनोगताचा दुसरा दिवस ,मी आज पासून माझ्या प्रवासाची कहाणी सुरू करते, मी 2004 आणि 2017 साली असे दोनवेळा युरोपला जाऊन आले,पहिल्यांदा गेले तेव्हा खूपच exited होते कारण प्रथमच विमानात बसणार होते,आणि परदेशाची ही पहिलीच वारी होती त्यामुळे सगळीकडे बघताना अगदी बारीक निरीक्षण असे,हे असे का ,ते तसे का,तेथील स्वच्छता,शिस्त,प्रामाणिकपणा,वक्तशीर पण याबद्दल खूप ऐकले होते . लहानपणी जेव्हा इतिहासात ब्रिटिशांनी आपल्या देशावर शेकडो वर्षे राज्य केले,ते ब्रिटिश लोक कसे आहेत,काय त्यांच्या अंगी असे गुन आहेत की ते दुसऱ्या देशावर राज्य करू शकतात,असे बरेच प्रश्न होते . मी माझा भाचा लंडनला होता त्याच्याकडे आधी महिनाभर गेले,आणि मी आपली निरीक्षण करत राहायची आणि काही शंका असेल तर त्याला विचारायची तो लगेच माझ्या शंकेचे निरसन करायचा ,परंतु दुसऱ्या वेळी गेले तेव्हा माझे बरेच देश बघून झाल्याने काही शंका नव्हत्या . मी आता माझ्या 2017 वेळच्या युरोप टूर बद्दल लिहिणार आहे,तर सुरुवात करू लंडन पासून कारण ते आमचे पाहिले डेस्टिनेशन होते .आम्ही मँगो हॉलिडे तर्फे luftansa ऐअरवेज ने प्रथम मिलान मार्गे लंडन येथील ह...

मनोगत

सख्यानो आज आपला मनोगताचा दिवस,मी माझे मनोगत प्रवास वर्णना द्वारे व्यक्त करणार आहे . ☺️ ☺️ फार पाल्हाळ लावून बोअर करणार नाही,पण तुम्हाला उत्सुकता वाटेल आशा प्रकारे मी तुम्हाला वेगवेगळ्या देशात आणि परदेशात फेरफटका मारून आणीन,आणि त्याद्वारे तुम्हाला परदेश प्रवासाचा अनुभव मिळेल याची खात्री बाळगा .  💐 💐 मला प्रवासाची फार आवड,ही आवड मला माझ्या वडिलांकडून वारसा हक्काने आली आहे ,त्यांनी मलाच काय सर्व कुटुंबाला आजी साहित 50 वर्षा पूर्वी जवळ जवळ पूर्ण भारत देश फिरवून आणलाय, त्याकाळी आजच्या सारखी प्रवासाची साधने ,तसेच हॉटेल्स आणि पर्यटन कंपन्या कशाचीही सोय नव्हती किंवा 4-4 महिने आधी रिझरवेशन ची पण सोय नव्हती . आमच्या सोबत आम्ही स्वयंपाकाचे साहित्य डाळ,तांदूळ,चहा,साखर,भांडी आणि स्टोव्ह असे सगळे साहित्य एका पत्र्याच्या पेटीत घ्यायचो, जिथे जाईल तिथे रॉकेल,भाजी आणि थोडेसे गोडेतेल घ्यायचो असे विंचवाचे बिऱ्हाड आमच्या पाठीवर असायचे ,सोबत एक नोकर असायचा तो भांडी घासणे,भाजी आणणे,निवडून देणे ,ओझी उचलणे ही कामे करायचा ,त्या बदल्यात आणि त्याला फ्री न्यायचो ,त्यालाही आमच्या बरोबर चार धाम आणि सगळे बघायल...