**घटस्थापना पहिला दिवस **
काल रेखा कुलकर्णी यांचा या ग्रुपवर लेख वाचला आणि मला माझी 1994 सालची घटना आठवली ,घटस्थापणेचा पहिला दिवस,मी कोर्टात
नोकरीला होता ,त्या दिवशी लवकर उठून मी पुरणपोळी चा नैवेद्य दाखवून काम जरा जास्त असल्याने 9/30 च्या लोकलने शिवाजीनगर
येथे कोर्टात गेले .
दिवसभर देखील खूपच कामाचा लोड
होता,एका वकिलांना चतृशृंगी यात्रेवर स्टे ऑर्डर
मिळवायची होती त्याचीच तयारी सुरू होती ,
म्हणून मला संध्याकाळी पण काम संपवायला
उशीर झाला,6 वाजले आणि 6/15 ची लोकल
होती चिंचवड ला जायला,म्हणून मी घाईघाईने
हातातले काम संपवले आणि थोडी घाईनेच
स्टेशनकडे निघाले ,कोर्ट समोरील रस्ता ओलांडला
की रेल्वेच्या रुळावरून 5 मिनिटात शिवाजीनगर
स्टेशन होते ,पण मी रस्ता ओलांडत असताना काय
झाले कळलेच नाही,डावीकडून संचेती हॉस्पिटल
कडून एक M 80 भरधाव वेगाने आली आणि
मला धाडकन धडक मारली,मला काय होत आहे
कळलेच नाही,मी फक्त आई ग म्हणून जोरात
ओरडले आणि बेशुद्ध पडले एव्हढेच मला आठवते
त्यानंतर दोन दिवसांनी मी शुद्धीवर आले तेव्हा
हर्डीकर होस्पिटल मध्ये होते .
मी जेव्हा "आई ग " म्हणून ओरडले तेव्हा
माझ्या ओळखीचे दोन वकील समोर उभे होते
तेव्हा त्यांनी आवाज ऐकला आणि त्या ठिकाणी
धावून आले,मी ओळखीची दिसल्याने त्यांनी
मला ताबडतोब रिक्षात घातले आणि जवळच
असलेल्या हर्डीकर दवाखान्यात ऍडमिट केले ,
तेव्हा आसे कळले की,त्याच्या गाडीचा एक पार्ट
तुटून माझ्या डाव्या गुडघ्याच्या खाली घुसून
मला दीड इंचाची जखम झाली,त्यातून भळाभळा
रक्त येऊन माझी सगळी साडी रक्ताने भरली,डाव्या
डोळ्याच्या खाली जखम झाली आणि डावी पूर्ण
बाजू फ्रॅक्चर झाली होती ,मी पूर्ण बेशुद्धीतच होते
आंणि माझी मोठी बहीण जी मला आई सारखी
होती तिचे सारखे नाव घायची आणि तिला बोलवा
आसे सांगायची .😢😢
इकडे घरी मिस्टर आणि दोन मुली एक दहावी आणि दुसरी बारावीला होती ते सगळे माझी वाट बघायला लागले,तेव्हा आमच्या घरी फोन पण नव्हता एक लोकल गेली,दुसरीने येईल ,लोकल चुकली तर बसने येईल म्हणून माझे मिस्टर basstop आणि स्टेशन असे चकरा मारायला लागले , इकडे वकिलांनी माझ्या डायरीतून फोन
नंबर घेऊन जो आमच्या शेजारच्यांचा होता ,त्यांना
फोन करून माझ्या अपघाताची कल्पना दिली आणि सगळे घाबरत म्हणून किरकोळ लागले असे
सांगितले त्यामुळे मिस्टर मला भेटायला एकटेच
हॉस्पिटल मध्ये आले,इकडे पोरी रात्रभर काळजीत
की आईला नेमके काय झाले असेल,आशावेळी
आताचे मोबाईल उपयुक्त वाटतात .**
माझा सगळं भयानक अवतार बघून तर मिस्टर हबकूनच गेले,ते मनाने थोडे हळवे आहेत,
पण माझी अवस्था बघून कोणालाही असेच झाले
असते,डोक्याला पट्टी,पाय वरती लटकवलेला
डाव्या हाताला बँडेज भयानक रूप होते ते माझे ,
इकडे दोन्ही वकिलांनी माझ्या पर्स मधील 6/7
रुपये,तसेच हातातील सोन्याच्या बांगड्या,मंगळसूत्र
एक रुमालात बांधून safe ठेवले होते ते मिस्टरांना
दिले आणि ते हॉस्पिटल मध्ये येईपर्यंत ते माझ्याजवळ थांबले ,त्यांची नावे ऍड तांबे आणि ऍड देसाई हे अक्षरशः देवीच्या रूपाने माझ्यासाठी
धावून आले आणि मला मोलाची मदत केली ,नाही
तर मी मदतीविना केव्हाच मेले असते एव्हढा तो
भयानक अपघात होता,ज्याने ठोकर मारली त्याला
तर काही देणे घेणे नव्हते तो पळून जात होता ,पण
वकिलांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले
पण त्याने नंतरही काहीही मदत केली नाही .😢😢
आशा तऱ्हेने मी घटस्थापना ते नंतर दिवळीनंतरही एकूण 45 दिवस हॉस्पिटल मध्ये
होते ,ति माझी हॉस्पिटल मधील दिवाळी मी
आयुष्यात कधीही विसरता आली नाही ,त्यांनतर
मी नऊ महिने वॉकर घेऊन चालत होते ,पण माझा
डावा पाय अधू झाला तो कायमचा ,एकच देवीचे
आभार मानते तिने मला यातून सहीसलामत वाचवले .
त्याचवेळी माझी एक मुलगी दहावी बोर्ड आणि
दुसरी बारावी बोर्ड,मला खूप रडू यायचे कारण
माझ्यामुळे त्यांचे नुकसान व्हायला नको,पण त्या
सुद्धा एव्हढ्या जिद्दीच्या की टेरेसवर जाऊन, मैत्रिणीकडे जाऊन अभ्यास करायचा ,
शिवाय मी घरात नसल्याने। माझे। औषधपाणी भेटायला येणाऱ्या लोकांचे पाहुणचार यातच
त्यांचा खूप वेळ जायचा आणि अभ्यासाला वेळच
मिळायचा नाही परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी
खूप मेहनत घेऊन दहावीत 90 % आणि बारावीत
असलेल्या मुलीने 88% मार्क्स मिळवले त्यामुळे
माझीही खंत जरा कमी झाली,पण या घटनेमुळे
मला माझ्या मुलींचा खूप अभिमान वाटतो ,
कारण त्यांनी घर तर संभाळलेच शिवाय अभ्यास
करून शालेय नुकसान पण होवू दिले नाही,देवा
मी तुझी खूप आभारी आहे,कारण असे रत्न तू
माझ्या पोटी जन्माला घातलेस। *******
दर वर्षी घटस्थापना आणि 5 ऑक्टोबर ला
या घटनेची आठवण होतेच होते .
💐💐सरोज कोले 💐💐
Comments
Post a Comment