🌹#सुखदा 🌹
#सुखदा हे डॉ.विजया वाड यांच पुस्तक वाचून पूर्ण झालं,विजया वाड यांच हे पहिलच पुस्तक वाचलं, छान आहे *** #सुखदा आणि विश्वनाथ हे या कथेचे नायक,नायिका, बालपणा पासून एकमेकांचे मित्र,कॉलेजमध्ये असताना एका प्राध्यापकांच्या भाषणावर प्रभावित होतात,त्यांचे म्हणणे असे की जीवनात येऊन माणसाने किडा मुंगी सारखे जगून न मरता काही तरी विशेष काम करून मग मरावे...हे दोघेही त्या विचाराने प्रभावीत होतात, त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते,पण असेच सर्वसामान्य जीवन न जगता आपण काहीतरी वेगळे करू,तेही वेगवेगळ्या वाटांनी जाऊन असे ठरवतात...एकमेकांशी लग्न न करता चार वर्षानी एकत्र भेटू असे ठरवून मित्र मैत्रिणीच्या समक्ष एका मंदिरात जाऊन शपथ घेतात आणि चार वर्षांनी याच तारखेला याच मंदिरात येऊन लग्न करण्याचे ठरवतात 💐 💐 # वेगवेगळे होण्याच्या आगोदर माझ्या आजीला भेटू असे सांगून विश्वनाथ तिला आजीकडे चार दिवस ठेवून घेतो,तिथे त्यांची जवळीक निर्माण होते, तिथून तशीच ती आपल्या मावशीकडे मुंबई येथे काहीतरी करू दाखवण्या साठी जाते,तिचे काका फिल्म इंडस्ट्रीमध्ये कपडेपटात काम करीत असतात,त्यांच्या ओळखीने तिला कपड्याला...